Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाऊसाहेब पठाण यांचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर शाखेच्यावतीने भव्य सत्कार.!

Admin by Admin
February 2, 2025
in महाराष्ट्र
0
भाऊसाहेब पठाण यांचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर शाखेच्यावतीने भव्य सत्कार.!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर : ( रमेश सुरवसे ) राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण हे प्रदीर्घ प्रशासकीय सेवेमधून नियत वयोमानानुसार दि.31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा दि.01/02/2025 रोजी सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर मुंबई येथील आलिशान सभागृहात राज्य सरकारी अखिल भारतीय राज्य सरकारी (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.के गणेशन (केरळ) यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे नेते राजाभाऊ सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य सरकारी (गट- ड) चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, सटवाजी होटकर , आणि चंद्रकांत चलवादी या निष्ठावंत जुन्या नेत्यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब तथा भिमराव आंबेडकर यांचे पिताश्री वडील सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर (संकपाळ) यांचा “सुभेदारी” या रुबाबदार वेश्यातील अतिशय दुर्मिळ असलेला फोटो बहाल करून शाल, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी राज्य सरकारी (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक प्रकाश जाधव (सातारा) तसेच रासकम. संघटनेचे पुणे जिल्ह्याचे कर्तबगार अध्यक्ष तसेच विभागीय अध्यक्ष मारुतीराव शिंदे (पुणे) या ज्येष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार समारंभ सोहळ्याला अखिल भारतीय सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सीताराम सुलानिया (दिल्ली), राज्य सरकारी कर्मचारी ” राजपत्रित महासंघाचे ” प्रदेश सरचिटणीस समीर भाटकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक दगडे (नागपूर), मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, व इतर मान्यवर नेत्यांची विशेष उपस्थिती होती. या सत्कार समारंभ सोहळ्यास अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघांचे प्रमुख प्रतिनिधी म्हणुन तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, हरियाणा, कर्नाटका, यां पर राज्यातूनही अखिल भारतीय महासंघाचे प्रमुख नेते मंडळीची उपस्थित होती. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्हा पदाधिकारी आणि कर्मचारी हे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून यां सत्कार समारंभ सोहळ्याकरिता आलेले होते.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याबरोबर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या तृतीय श्रेणी (वर्ग -3) च्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या सेवा पूर्ती सत्कार समारंभ सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते.यानंतर सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळ्यापूर्वी भाऊसाहेब पठाण हे मुख्य संपादक असलेल्या ” कर्मचारी टाइम्स ” हे दैनिक मराठी वृत्तपत्र दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे ” कर्मचारी टाइम्स ” या मराठी वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन कार्यक्रम मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

Previous Post

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

Next Post

प्रा.हणमंत हांडे यांनी रेखाटलेले भव्य चित्र प्रदर्शन

Admin

Admin

Next Post
प्रा.हणमंत हांडे यांनी रेखाटलेले भव्य चित्र प्रदर्शन

प्रा.हणमंत हांडे यांनी रेखाटलेले भव्य चित्र प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697