सामाजिक
चपळगाव येथे आयपीएस तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस साजरा

शिवम्मा प्रतिष्ठान कडून करतात प्रतिवर्षी वाढदिवस
अक्कलकोट (प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे पुण्याच्या पोलीस उपायुक्त आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले सरकारी वकील बेसकर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले अशोक घोगरे यांचा व ग्रामसेवक पदी निवड झाल्याबद्दल समर्थ हरणे यांचा तर तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झालेले कल्लाप्पा बडूरे यांचा सन्मान शिवम्मा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी ग्रामसेवक सोमनाथ कणगी जि, प,मुख्याध्यापक सतीश वाले,शिवम्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तमा गजधने आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.