सोलापूर
सोलापूरची वैष्णवी राम गायकवाड राज्यात पहिली!

सोलापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरच्या कु. वैष्णवी राम गायकवाड ही मुलीत राज्यात पहिली आली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु म वि शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर तर अभियांत्रिकी शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्षी दि बाटू विद्यापीठ मध्ये प्रथम आली होती. वैष्णवी ही मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची कन्या आहे.
वैष्णवी राम गायकवाड यांच्या यशाबदल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.