बैल पौळा सणा निमित्ताने नरसी व नायगाव बाजारपेठेत बैलजोडी मुर्ती गाय बैल व पुंजनाच्या साहित्याने सजली…!

नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )
बैल पौळा सणाच्या निमित्ताने घरोघरी पूजनांसाठीआकर्षक अशा बैलजोडी.गाय मुर्ती बैलाला सजविण्या करिता लागणारी साहित्य पुजनासाठी मोठ्या प्रमाणात नरसी व नायगाव बाजारपेठे मध्ये विक्रीसाठी आल्या असून नागरीक युवक हे घेण्यासाठी व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. २ सप्टेंबर २०२४ रोजी शेतकरी सर्जा राजा असलेल्या बैल पोळा सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो तर अनेक परिवाराच्या निवासस्थानी आकर्षक व विविध आकारातील मुर्ती पुजन करण्यात येत असतो, ग्रामीण भागात शेतकरी हा सण विधीवत साजरा करत असतो, सणाच्या निमित्ताने विविध कलाकृती बैलजोड मुर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
तर सर्जा राजासाठी सजावटीसाठी विविध आकर्षक अशा अनेक झुल, सांज, दोरी, कवडी, गळ्यातील घंटा, भाषिंग यासह विविध अशी सजावटीसाठी विविध कलर मध्ये अनेक
वस्तू या दुकानात विक्रीसाठी आल्या आहेत. बाजार पेठेत अनेक दुकानात बैल पोळा सणाच्या निमित्ताने सजावटी ठेवलेल्या वस्तूने थाटली असुन ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक शेतकरी व नागरिक महिला युवक मोठ्या प्रमाणात आकर्षक बैलजोडी, व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. बैल जोडी व गाय सत्तर रूपये ते आपल्या सवडी प्रमाणे ऊपलब्ध आहेत.शेतकरी राजा आपल्या सर्जा राजाला सजविण्यासाठी व पुजनासाठी लागणारी साहित्य खरेदी करतानां एकच गर्दी केली आहे.