राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी अक्कलकोट विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री सुनिल शिवाजी बंडगर यांनी सोमवारी मोठ्या गाजावाजाने धनगरी ढोल तसेच हालगीवाद्यासह रॅली काढुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फत्तेसिंह चौकापासून रॅलीला सुरुवात झाली पुढे कमलाराजे चौक,एवन चौक,नवीन राजवाडा, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, तुप चौक, फत्तेसिंह चौक येथे समाप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, संतोष शिंदे, निलेश लवटे, गुणवंत लवटे, महादेव पुजारी, पुंडलिक पुजारी,विष्णू ठेंगले, किरण माने, विठोबा कोळेकर, रेवणसिध्द शेरी, भुताळी पुजारी, काशिनाथ घोडके, औदुंबर बंडगर, रवी सलगरे, बिरप्पा मैंदर्गी, सोमनाथ घोडके, सद्दाम तासेवाले, समीर कोरबू, शिवनिंगप्पा गायकवाड, भिमाशंकर बंदिछोडे, शिवयोगी पुजारी यांच्या सह आदी उपस्थित होते.



