महाराष्ट्र

नरसी येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वरा हॉस्पिटलमध्ये अद्ययावत 4D सोनोग्राफी सुविधा सुरू

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजीम नरसीकर )

नायगाव तालुक्यातील नरसी येथील व्यंकटेश्वरा हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटर येथे रुग्णसेवेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची भर पडली असून, आता सर्व प्रकारच्या तपासणीसाठी अत्याधुनिक 4D सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाले आहे. या नव्या सुविधेमुळे नरसीसह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.गर्भवती महिलांसह सर्वसाधारण रुग्णांच्या विविध प्रकारच्या सोनोग्राफी तपासण्या आता अधिक अचूक व आधुनिक पद्धतीने येथे करण्यात येणार आहेत. याठिकाणी डॉ. सुर्या व डॉ. बिरादार हे अनुभवी सोनोग्राफी तज्ञ सेवा देणार असून, हृदयरुग्णांसाठी 2D इको (2DECHO) तपासणीसाठी नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटल मधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीकांत भोसकर हेही नियमित उपलब्ध असणार आहेत.

रुग्णांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेली ही सुविधा नरसी व परिसरातील जनतेसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत बिलोली व नायगाव तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी तपासणी करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. ही माहिती डॉ. सौ. स्वरूपा जाधव व डॉ. ज्ञानेश्वर जाधव, व्येंकटेश्वरा हॉस्पिटल, बिलोली रोड नरसी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button