Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार  सिद्धाराम म्हेत्रे  यांचे शक्ती प्रदर्शन करून  मिरवणुकीने अर्ज दाखल

Admin by Admin
October 28, 2024
in राजकीय
0
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार  सिद्धाराम म्हेत्रे  यांचे शक्ती प्रदर्शन करून  मिरवणुकीने अर्ज दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
२५० अक्कलकोट विधानसभा निवडणुकी करिता  सोमवारी कॉग्रेस महाविकास आघाडीकडून  माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थिती मध्ये भव्य जल्लोषपुर्ण वातावरणात  हालगी वादयाच्या गजरात मिरवणुक काढून अर्ज भरला . यावेळी शक्ती प्रदर्शन करीत माजी मंत्री सिद्धाराम  म्हेत्रे यांनी अर्ज भरला. अक्कलकोट तहसिल कार्यालयात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी जि. प. सभापती मल्लिकार्जून पाटील , काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला , शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे आदी उपस्थित होते.
काँग्रेस महाविकास आघाडीकडून दुपारी १२ वाजता काँग्रेस पक्ष कार्यालयापासून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याचीं भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत काँग्रेस पक्षाचे  उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे , युवा नेते प्रथमेश म्हेत्रे  सह विविध नेते मंडळी हे उघड्या जिपमध्ये उभे राहून नागरिकांना अभिवादन करत होते. अक्कलकोट शहरातील बस स्थानक, विजय कामगार चौक , कारंजा चौक , मेन रोड , वीर सावरकर चौक , राजे फत्तेसिंह चौक , एवन चौक ते काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत भव्य रॅली संपन्न झाली. या रॅलीचा समारोप काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर जाहीर सभा घेऊन करण्यात आला.
 यावेळी रईस टिनवाला , अशपाक बळोरगी , शंकर म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे ,शिवराज म्हेत्रे, उदय म्हेत्रे ,  मल्लीकार्जुन पाटील , मल्लीकार्जुन काटगाव , व्यंकट मोरे , अल्लीबाश अत्तार, शबाब शेख , आनंदराव सोनकांबळे , बाबूराव पाटील , सद्दाम शेरीकर , बाबासाहेब पाटील , संगमनाथ म्हेत्रे , सिद्धार्थ गायकवाड , सिद्धाराम भंडारकवठे , मुबारक कोरबू , रामचंद्र समाणे ,महादेव  चुंगी आदींसह अक्कलकोट व दक्षिण सोलापूर  तालुक्यातील मोठया प्रमाणत कॉग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
Previous Post

राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी अक्कलकोट विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697