शैक्षणिक
अक्कलकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नागनळी आश्रम शाळेचे यश

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दिनांक 29 जुलै वार मंगळवार रोजी आयोजित केलेल्या अक्कलकोट तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत नागनळी तालुका अक्कलकोट आश्रमशाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या हॉलीबॉल स्पर्धेत वय वर्ष 14 मुले प्रथम क्रमांक वय वर्ष 17 मुले व वय वर्ष 17 मुली प्रथम क्रमांक या 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली वय वर्ष 19 मुले यांनी अंतिम विजय संपादन केला या संघाची सुद्धा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत राजट्टे, मोहन गुरव व राजेंद्र साखरे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रम शाळेचे संस्थापक सचिव जावेद पटेल माध्यमिक मुख्याध्यापक तथा प्राचार्य इस्माईल मुजावर प्राथमिक मुख्याध्यापक रईस शेख आश्रम शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.