सामाजिक

श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीनमठ नागणसूर  मठाचे श्री जगद्गुरु बसवलिंग महास्वामी यांच्या ९२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीनमठ नागणसूर  मठाचे श्री जगद्गुरु बसवलिंग महास्वामी यांच्या ९२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती श्री डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामी यांनी दिली.

 श्री जगद्गुरु बसवलिंग महास्वामी यांच्या ९२ व्या पुण्यतिथीनिमित्त नागणसूरचे नंदादीप श्री जगद्गुरु बसवलिंग रत्न प्रशस्ती प्रधान कार्यक्रम , सामूहिक विवाह , जंगम गणराधना , सुवासिनींची ओटी भरणे व महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता भक्तीगीत भावगीत व जानपद गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी महारुद्र अभिषेक ,षटस्थळ ध्वजारोहण, सामूहिक विवाह , धर्मसभा , ११ हजार सुवासिनी ओटी भरण्याचा कार्यक्रम व सात हजार जंगमांचे जंगमाराधन आणि भक्तांना पुरणपोळी व तुपाचे महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रींच्या भव्य फोटोची व वचनग्रंथांची भव्य मिरवणूक नागणसूर गावातून काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विविध मठांचे मठाधिपती महास्वामीं , राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागणसूर येथील श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीन मठ येथे श्री जगद्गुरु बसवलींग महास्वामी यांच्या ९२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविक भक्तांनी सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागाणसूर मठाचे मठाधिपती डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button