सामाजिक

अक्कलकोट येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे भव्य लेझीम मिरवणूक संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
६८.व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यु जी .कंपनी भिम नगर मित्रपरिवार संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक उत्तम  गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विजयादशमी दिनी  अक्कलकोट शहराच्या प्रमुख मार्गावरून  भव्य दिव्य लेझीम ताफा काढण्यात आले. या मिरवणुकीची सुरुवात भीम नगर अक्कलकोट येथून करण्यात आली प्रारंभी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची पूजन उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व पोलीस उपनिरीक्षक करपे यांच्या हस्ते  करण्यात आले. यानंतर या भव्य लेझीम मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.अक्कलकोट शहरातील राजे फत्तेसिंह चौक एवन चौक , बस स्थानक परिसर, विजय कामगार चौक , कारंजा चौक , मेन रोड , राजे फत्तेसिंह चौक ते भीम नगर मैंदर्गी रोड पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीचे प्रमुख केंद्र भगवान गौतम बुद्ध यांचे भव्य दिव्य मूर्ती सजावट डेकोरेशन आकर्षक ठरले. सदरची मिरवणूक पाहण्यासाठी अबालवृद्धानी गर्दी केली होती. शेवटी आभार माजी नगरसेवक उत्तम गायकवाड व युवा नेते तुषार गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button