सामाजिक

अक्कलकोट येथे गुरुमाऊली गेस्ट हाऊसचे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावरील गुरुमाऊली गेस्ट हाऊस चे उद्घाटन दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात करण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजनराजे भोसले यांच्या हस्ते गुरुमाऊली गेस्ट हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे इकरार शेख चपळगावचे युवा नेते शाकीर पटेल अबूजर पटेल , मंगळवेढयाचे मुझ्झफर काझी, शकील काझी, हनीफ मुजावर, मतीन पटेल , पद्माकर डिगे , लाला राठोड चौडप्पा घोसले , मुबारक कोरबू ,प्रशांत साठे , रऊफ सरकार पाशा पिरजादे , दातापीर साहेब, एजाज बळोरगी,  मैनोद्दीन कोरबू ,सोलापूरचे मत्स्य व्यापारी सादिक जहागीरदार ,गाजी जहागीरदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजिज शेख, यासीन पटेल, बबलू पठाण ,संतोष भोसले , संतोष माने आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार फारूकपाशा काझी , मंजूर काझी अशपाक काझी, आदिल काझी आदींच्या हस्ते करण्यात आले .माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपस्थित राहून काझी परिवाराच्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री म्हेत्रे यांचा काझी परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी काझी परिवारास सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button