सोलापूर
मुख्यमंत्र्यांचे अतिवृष्टी बाधितांना आर्थिक मदतीचे आश्वासन – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी रात्री मुसळधार असा पाऊस झाला असून यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . अतिवृष्टीची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना आर्थिक मदत करू असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिले आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकरी हा हवालदिल झाला असून शासनाच्या मदतीकडे त्याच्या नजरा लागल्या आहेत. सततच्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी थांबले आहे. शेती पिकाचें तसेच फळबागाचें मोठे नुकसान झाले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना शासन हे आर्थिक मदत करेल असे आश्वासन दिले आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.



