सामाजिक

अक्कलकोट लायन्स क्लबतर्फे शिक्षकांना लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना असलेल्या लायन्स क्लब अक्कलकोटच्यावतीने यंदाच्या वर्षी अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत शिक्षकांना लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे व लायन्स क्लब शाळेचे चेअरमन राजेंद्र हत्ते यांनी दिली.
       येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दुपारी एक वाजता लायन्स क्लबच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कारांचे वितरण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते व आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे. 
लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी :१) डॉ.ए.एस शिंदे -सी.बी खेडगी कॉलेज,अक्कलकोट २)आनंदप्पा शिवन्ना कोरे 
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल ३) कस्तुरचंद माणिकचंद आळंद-श्री शिवचलेश्वर हायस्कूल,मैंदर्गी ४)कल्पना कल्लया स्वामी, सौ.सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालय ५)सचिन मल्लप्पा डफळे ,मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला ६)दयानंद राम चिकणे,बसवेश्वर प्रशाला,काजीकणबस,ता.अक्कलकोट ७)परमेश्वर शरणप्पा यादवाडे जि.प.मराठी केंद्र शाळा,किणी,ता.अक्कलकोट ८)मसरत माजीद गौर,जि.प.शाळा,कर्जाळ,ता.अक्कलकोट ९)शंभूलिंग अशोक अकतनाळ जि.प.प्राथमिक मराठी केंद्र शाळा, चपळगाव,ता.अक्कलकोट १०)सुरेश शिवाजी भोसले,मूकबधीर निवासी शाळा,अक्कलकोट ११)शंभुलिंग शिवकुमार बशेट्टी,माध्यमिक आश्रम शाळा,नागनहल्ली ता.अक्कलकोट 
   याप्रसंगी अक्कलकोट लायन्स क्लबचे सचिव ला.शिरीष पंडित खजिनदार ला.विठ्ठल तेली,प्रथम उपाध्यक्ष ला.चेतन जाधव,ट्रस्टचे उपाध्यक्ष सुभाष गडसिंग,माजी अध्यक्ष ला.प्रभाकर मजगे,माजी अध्यक्ष ला.शदीद वळसंगकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button