महाराष्ट्र
ना.उदय सामंत यांची शिवसेना ग्रंथालय सेल यांनी घेतली भेट

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री व पालकमंत्री उदयजी सामंत यांच त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र शिवसेना ग्रंथालयाचे शिष्टमंडळाने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारा महाराष्ट्र ग्रंथालय शिवसेना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्या संदर्भात व महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या विविध अडचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी ना.सावंत यांनी सांगितले की निवडणुकी आधी तुमच्या समस्या सोडवल्या जातील मला तुमच्या सर्व अडचणी माहिती आहे तुम्ही काळजी करू नका.
या प्रसंगी महाराष्ट्र ग्रंथालय सेना राज्य प्रमुख बी. जी. देशमुख व राज्यातील कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.