Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार

Admin by Admin
September 13, 2024
in टॉप न्यूज
0
लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नारीशक्ती दूत’ ॲप बंद

मुंबई -राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला असला,
तरी सध्या या अर्ज भरण्याचे ॲप आणि पोर्टल चालत नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांमधून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होऊ लागला.लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, अंगणवाडीसेविका अर्ज भरणार आहेत.दरम्यान, अंगणवाडीसेविकांना प्रशासनाकडून सूचना नसल्यामुळे त्याही अर्ज भरून घेत नाहीत.दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली,
यासाठी महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली.यासाठी सरकारने निश्चित केलेल्या अटींमध्ये वारंवार बदल केला आहे. जिल्ह्यातील सात लाख २० हजार महिलांनी अर्ज भरले आहेत.
त्यापैकी सात लाख महिलांच्या अर्जाला मंजुरी दिली आहे.शासनाने नव्याने विकसित केलेले नारीशक्ती दूत हे ॲप चालत नाही.लाडकी बहीण पोर्टलही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.
त्यामुळे अर्ज भरणाऱ्या महिला त्रस्त आहेत.ज्या महिलांनी ॲप व पोर्टलद्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत,त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा संदेश आला,तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूरचा संदेश मिळाला.काही महिलांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र, त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या आहेत.मात्र, पोर्टल आणि ॲप बंद असल्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढली आहे.अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आता ॲपवरून अर्ज न भरता थेट अंगणवाडी सेविकाच अर्ज भरतील,असे सांगण्यात येत आहे.मात्र, त्याबाबत अंगणवाडी सेविकांना अद्यापही कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकता -लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून अंगणवाडी सेविका अर्ज भरणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या कामात आणखी एक भर पडल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Previous Post

माकपाचे जेष्ठ नेते सिताराम येचूरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन

Next Post

ना.उदय सामंत यांची शिवसेना ग्रंथालय सेल यांनी घेतली भेट

Admin

Admin

Next Post
ना.उदय सामंत यांची शिवसेना ग्रंथालय सेल यांनी घेतली भेट

ना.उदय सामंत यांची शिवसेना ग्रंथालय सेल यांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697