Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर  “राजकारणातील पाच दशके” ह्या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन.

Admin by Admin
September 10, 2024
in टॉप न्यूज
0
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर  “राजकारणातील पाच दशके” ह्या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सुशिलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करू नये. ~ खा.मल्लिकार्जुन खर्गेनवी दिल्ली -दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार रशिद किडवाई यांनी शब्दांकन केलेले सुशिलकुमार शिंदे यांच्यावरील इंग्रजी आणि हिंदी भाषेतील आत्मकथनपर पुस्तक “FIVE DECADES IN POLITICS” (“राजकारणातील पाच दशके”) असे शिर्षक असलेल्या ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह आणि, शिक्षणतज्ञ विजय धर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे संपन्न झाला.

सुशिलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की; सुशिलकुमारजी ज्या काँग्रेसचे आपण सदस्य आहात, ज्यात वाढलात-रुजलात याच काँग्रेस पक्षाने तुम्हाला मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि देशाच्या गृहमंत्री, लोकसभेचे पक्षनेते अशा पदापर्यंत पोहोचवले. आणि, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून आजपर्यंत निवडणूक लढविलेल्या उमेदवारात आपणाला आजपर्यंत सर्वांत जास्त ३०५ मते मिळाली. यातच सुशिलकुमार शिंदे यांचे व्यक्तित्व आणि, क्षमता दिसून येते. त्यामुळे, अजून काय हवे आहे? राजकारणात पन्नास-पंचावन्न वर्षे टिकणे अवघड आहे. पण, दलित समाजातील सुशिलकुमार शिंदेजी आपल्या जीवनात अनेक संघर्ष व हालअपेष्टा सहन करत, आपल्या शांत आणि हसमुख- संयमी स्वभावामुळे तसेच; निष्ठेेमुळे अनेक मोठ्या पदावर पोहोचले. त्यामुळेच आयुष्यभर महाराष्ट्राची आणि, देशाची सेवा करत आहेत. सध्या देशात काही वेगळ्या विचारधारा मानणाऱ्या लोकांचा जोर सुरू आहे. त्याविरुद्ध आणि काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जरी सुशीलकुमार शिंदे यांचे वय ८४ वर्षे झाले असले तरीही ज्यांचा आपल्या विचारधारेवर विश्वास आहे; ज्याला देशाची व, लोकांची सेवा करायची आहे त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करावे लागेल म्हणून सुशिलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची गोष्ट करू नये. त्यांनी आयुष्यभर जे शिकले, सहन केले, जे मिळविले ते लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे, आपण यापुढेही काम कराल असा विश्वास आहे असे म्हणत सुशिलकुमार शिंदे यांच्या जीवनावर आधारित “राजकारणातील पाच दशके” ह्या पुस्तकात त्यांच्या राजकीय प्रवासाची सखोल माहिती दिली. अशा माहितीमुळे सर्वांना प्रेरणा मिळेल असे विचार व्यक्त केले.

हे पुस्तक २४० पानी असून एकूण आठ विभागांत आपल्या राजकीय कारकीर्दीतील विविध विषयांवरचे लेखन सुशिलकुमारजी यांनी यामध्ये केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांच्या शुभेच्छा एका पानावर आहेत. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छोटेखानी प्रस्तावनाही सदर पुस्तकाला लाभलेली आहे.

सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे; आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीचे हे इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तक सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय वारसदार असलेल्या आणि, सध्या सोलापूरच्या खासदार असलेल्या लाडक्या कन्येला – प्रणिती शिंदे यांना अर्पण केलेले आहे. अर्पण पत्रिका अतिशय सुंदर आणि, भावनापूर्ण अशी झालेली आहे.

यावेळी प्रभा खैतान फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वस्ता आनिंदिता चटर्जी, फाउंडेशनच्या दिल्ली एनसीआर प्रकरणाच्या मानद संयोजिका नीलिमा दालमिया, अर्चना दालमिया, अनंतमाला पोतदार, करुणा गोयंका आणि, हार्पर-कॉलिन्स संस्थेचे प्रकाशक उदयन मित्रा यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले.

Previous Post

छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली येथील गणेश उत्सवाची ७७ व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापना

Next Post

बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

Admin

Admin

Next Post
बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697