सामाजिक
विवेकानंद प्रतिष्ठानची 9 सप्टेंबर 2024 पासून अक्कलकोट येथे गणेशोत्सव व्याख्यानमाला

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :- विवेकानंद प्रतिष्ठानचे गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक 9 ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान दररोज सायं.6.30 वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, ए-वन चौक, अक्कलकोट येथे होणार असल्याची माहिती विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. सालाबादाप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठानचे वतीने अक्कलकोटकरांसाठी नामवंत व्याख्यात्याची विविध कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.व्याख्यानमाला 6 दिवस चालणार आहे.या व्याख्यानमालेचे
पहिले पुष्प सोमवार,दि.09 सप्टेंबर रोजी पार्थ बावस्कर छत्रपती संभाजीनगर प्रख्यात व्याख्याते हे ‘भारत काल आज आणि उद्या’
दुसरे पुष्प मंगळवार, दि.10 सप्टेंबर रोजी गणेश शिंदे छत्रपती संभाजीनगर प्रख्यात व्याख्याते *जीवन सुंदर आहे !
तिसरे पुष्प बुधवार, दि.11 सप्टेंबर रोजी गायक अभिजीत कोसंबी, अबोली गिऱ्हे व अमिता घुगरी हे ‘रंग जल्लोष’ मराठी व हिंदी गाण्याचा बहारदार कार्यक्रम
चौथे पुष्प गुरुवार, दि.12 सप्टेंबर रोजी *’हसवा हसवी’ जॉनी रावत (हास्यसम्राट झी मराठी) दिव्येश शीखंडकर व राजदीप कदम
पाचवे पुष्प शुक्रवार, दि.13 सप्टेंबर रोजी धमाल विनोदी बाल नाट्य लेखक दिलीप प्रभावळकर हे ‘बोक्या सातबंडे’ निर्माते राहुल कर्णिक,रणजीत कदम व दीप्ती जोशी व प्रमुख भूमिकेत आरुष बेडेकर
सहावे पुष्प शनिवार, दि. 14 सप्टेंबर रोजी ‘चाणक्य’ महानाट्य अभिजात क्रिएशन निर्मित मिलाफ थिएटर्स प्रकाशित नाटक सादर होणार आहे.
या व्याख्यानमालेत साहित्य, व्यवस्थापन, अभिनय, जीवन व विनोद या विषयावर चतुरस्त्र व्याख्यान होणार आहे तरी अक्कलकोट तालुक्यातील रसिकांनी व विशेषता तरुण-तरुणी या व्याख्यानमालाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
