सामाजिक

वीरशैव-लिंगायत वधू-वर परिचय मेळावा ता. २७ सप्टेंबर रोजी आयोजन 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): गेल्या १५ वर्ष्यात २ हजार पेक्षा जास्त वधू आणि वर यांची मोफत लग्ने जुळविण्यात यशस्वी झालेले तडवळ, ता. अक्कलकोट येथील इरणा पनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव-लिंगायत समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य स्थळे उपलब्ध व्हावीत आणि समाजातील वैवाहिक जुळवाजुळव अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने ‘चालता बोलता वीरशैव-लिंगायत कायमस्वरूपी मोफत वधू-वर सूचक, सोलापूर’ यांच्या वतीने यावर्षी चौथा वीरशैव-लिंगायत वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत गोविंदश्री मंगल कार्यालय, सोलापूर येथे होणार आहे. श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज (निरगुडी) यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी राहणार आहेत.यावेळी डॉ. श्रीकांत माकम, विष्णू दासरी, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील, संजीव पाटील, विकास बुळळा, लक्ष्मण झळकी, शिवा बाटलीवाला, भीमण्णा ग्वाड्याळ, अण्णाराव याबाजी आणि साधू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.महाराष्ट्र, कर्नाटक तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यांतील वीरशैव-लिंगायत समाजातील सर्व उपजातींच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे पालक व इच्छुकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मेळाव्यात वधू-वर परिचय, स्थळांची देवाणघेवाण तसेच पालकांना परस्पर संवाद साधण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. समाजातील विवाह प्रक्रिया अधिक सुलभ आणि व्यापक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मेळाव्यासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी विश्वनाथ कापसे (मो. ९६५७०३६६७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.या मेळाव्याचे आयोजन राघवेंद्र बिराजदार, गौरीशंकर मजगे,राजशेखर चौधरी, मल्लिनाथ याळगी, दत्ता शिंदे, राजेश पारसे, सिद्धेश्वर कल्लूरकर, गजानन ग्वाड्याळ, नूतन मॅडम, सुरेश वाले, गुरु हिप्परगी, राजशेखर अंकलगी, सिद्धेश्वर चिट्टे, उमाकांत शटगार, गुरुनाथ नरुणे, मल्लिनाथ पनशेट्टी, बसवराज पनशेट्टी, धरेप्पा हडपद, ज्ञानेश्वर कस्तुरे, अशोक पाटील, शशिकांत वळसंगे, रायगोंडे सर, गंगदे सर, कार्तिक स्वामी, अनुराग पनशेट्टी, बसवराज याबाजी, विश्वजीत शेटे, दीपक उटगे तसेच सिद्धांत बचत गट, तडवळ यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button