सामाजिक
पोलीस दलात भरती झालेल्या अनिल गवंडी यांचा टायगर ग्रुपकडून सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सोलापूर पोलिस ग्रामीण दलात भरती झालेले अक्कलकोट संजय नगर भागातील अजय अनिल गवंडी यांचा व परिवाराचा सत्कार टायगर ग्रुप अमर शिरसाट मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला .
टायगर ग्रुप अमर शिरसाट मित्र परिवाराच्या वतीने शहरात वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना सायकल वाटप,वह्या वाटप,रुग्णांना फळे वाटप,मोल मजुरी करणारऱ्या महिलांना राशन किट गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलादिनी स्वतंत्र व्यासपीठ असे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम ग्रुपच्या वतीने होत असतात. याचाच एक भाग म्हणून पोलिस दलात नवनियुक्त निवड झालेले अजय गवंडी व त्यांच्या परिवाराचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम टायगर ग्रुप संपर्क कार्यालय समोर संजय नगर खासबाग येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मिलन कल्याणशेट्टी,चंद्रकांत गवंडी यांच्या हस्ते अजय गवंडी यांचा व त्यांच्या आई जयश्री गवंडी आजी सत्यभामा यांचा सत्कार विजु ताई गवंडी,अंजली शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला,
सत्कार समारंभात बोलताना अमर शिरसाट म्हणाले
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर अजय गवंडी यांनी यश मिळवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले भागातील प्रत्येक युवकाने अजय गवंडींच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करावी आपल्या देशाची सेवा करावी.
यावेळी योगेश पवार,बंटी पाटील, सागर शिरसाट,किरण शिंदे,वैजु मुकडे, सैपन सुतार, निशांत निंबाळकर,शेखर वाले,बिरू सरवदे,शुभम बहिरेवार,मल्लु गवंडी यांच्यासह परिसरातील माता भगिनी व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
