सामाजिक
अक्कलकोट शहर तालुक्यात दामिनी पथक नेमण्याची गरज

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सध्या राज्यासह देशभरात महिलांसह बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थिनी व महिला वर्गात सुरक्षितेची भावना निर्माण होण्यासाठी अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याचे अंतर्गत दामिनी पथक नेमण्याची मागणी नागरिकांसह पालक वर्गातून केली जात आहे .
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे व दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा विद्यालय महाविद्यालयाच्या परिसरात दामिनी पथकाची गस्त असणे गरजेचे आहे. राज्यभरात महिलांसह बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या लैंगिक अत्याचाराचा घटनांकडे बघता अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने दामिनी पथक निर्माण करून शाळा विद्यालय महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांसह पालकातून वाढली आहे. शाळा व महाविद्यालय भरण्या अगोदर व सुटल्यानंतर पोलीस पथक दामिनी पथकामार्फत गस्त घातल्यास शालेय विद्यार्थिनी व महिला वर्गात सुरक्षितेची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. अक्कलकोट दक्षिण व उत्तर पोलीस ठाण्याकडून दामिनी पथक सुरू करण्याची मागणी, पालकांसह नागरिकांतून केली जात आहे.
