सामाजिक
शेख नुरुद्दीन बाबा उर्स निमित्त महाप्रसाद वाटपाचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत शेख नुरुद्दीन बाबांच्या उरुस निमित्त दिनांक 23 ऑगस्ट रोजी प्रिन्स वेल्फेहर ट्रस्टच्या वतीने लंगर कमिटीकडून महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आल्याची माहिती प्रिन्स वेल्फेअर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अब्दुल रऊफ कादरी पिरजादे बाबा यांनी दिली आहे.
हजरत शेख नुरुद्दीन बाबा उरूस हा दिनांक 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. यावेळी प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट कडून दिनांक 23 ऑगस्ट रोजी हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गा परिसरात सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत शाकाहारी व मांसाहारी महाप्रसादाची वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष सय्यद अब्दुल रऊफ कादरी पिरजादे बाबा यांनी केले आहे.
