सामाजिक
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना.. सोलापुरात भीमशक्तीच्या वतीने निषेध

सोलापूर ( रमेश सुरवसे ) परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची दिनांक १० डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेचा निषेध करून जिल्हाधिकारी सोलापूर यांना भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी निषेधाचे निवेदन देण्यात आले .
यावेळी शिष्टमंडळात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंद
(नाना) प्रक्षाळे राज्याचे उपाध्यक्ष नागेश बंगाळे राज्यसचिव संजय रणदिवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सतीश खारवे तसेच विलास सरवदे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



