Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री संत सद्गुरू गंगागीर महाराज मठ संस्थानात धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Admin by Admin
January 17, 2026
in महाराष्ट्र
0
श्री संत सद्गुरू गंगागीर महाराज मठ संस्थानात धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव व राजगड नगर येथील श्री संत सद्गुरू गंगागीर उर्फ भंडारी महाराज यांची 85 वी पुण्यतिथी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रशस्त जागेमध्ये असलेल्या श्री गंगागीर महाराज येथील मठ संस्थानात अभिषेक भजन व आरती आणि श्री ह भ प गुरुवर्य मधुसूदन महाराज कापशीकर यांच्या समदूर वाणीतून कीर्तनरुपी सेवा झाली असून या धार्मिक कार्यक्रमाचा कोकलेगाव राजगड नगर व परिसरातील भाविकांनी लाभ घेतला आहे.
प्रत्येक गावाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असते कोण्या गावात संत जन्मा येतो तर कोण्या गावात समाज सुधारक क्रांतिवीर जन्मा येतात त्या गावच्या मातीचे भाग्य असतं की तेथील माती पावन झालेली असते मौजे कोकलेगाव व राजगड नगर येथे श्री सद्गुरु गंगागीर उर्फ भंडारी महाराज या महान संताचा जन्म झाला असून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने गेल्या 85 वर्षापासून अखंडपणे धार्मिक सेवा चालू आहे या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोकलेगाव राजगड नगर येथील प्रत्येक घरातील बाईलेकी आपल्या सासर येथून माहेरी हमखास येतात तर परिसरातील भाविक देखील आवर्जून उपस्थित राहतात या पुण्यतिथीनिमित्त भरगच्च जत्रा भरली जाते हा आनंदी सोहळा सर्वांना द्विगणित करणारा असतो दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी हरिभक्त परायण ओमकार महाराज आळंदीकर यांचे हरी जागर कीर्तनाची सेवा झाली तर दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनात हभप गुरुवर्य मधुसूदन महाराज कापशीकर यांनी कंठे धरीला कृष्ण मनी,अवघा जनी प्रकाश.. जगतगुरु संत तुकोबाराय यांच्या या अभंगाच्या आधारित सर्व समाज एकोप्याने राहणे हे माझ्या कीर्तनाचे रहस्य आहे असे अनमोल विचार त्यांनी भाविकांना दिली आहे. अखंडितपणे चालणाऱ्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज पुण्यतिथी सोहळा या कार्यक्रमास कोकलेगाव राजगड नगर येथील ग्रामस्थांचे योगदान फार महत्त्वाचे ठरले असून त्यांच्या परिश्रमामुळेच ही सेवा दरवर्षी चालू आहे या सोहळ्याला कोकलेगाव राजगड नगर यासह परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका निकाल

Next Post

सोलापूर महापालिकेत पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना पत्र 

Admin

Admin

Next Post
सोलापूर महापालिकेत पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना पत्र 

सोलापूर महापालिकेत पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना पत्र 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157259
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697