Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जनमेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे – अभिनेत्री वर्षा उसगावकर

Admin by Admin
October 4, 2025
in देश - विदेश
0
जनमेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे – अभिनेत्री वर्षा उसगावकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 पणजी  येथे जनमेजयराजे भोसले यांचा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )  अक्कलकोट येथे मी श्री स्वामी समर्थ समर्थांच्या दर्शनासाठी जाते. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले महाराज यांची आवर्जून भेट घेते. जनमेजयराजे भोसले हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो भाविकांची अन्नदानाची सोय करतात. अन्न हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे ही माझी भावना आहे. अन्नछत्र मंडळातील अन्नछत्राचे कार्य पाहून मी धन्य होते. जन्मेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे असून त्यांचा सन्मान हा गोवा भूमीत होतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन प्रख्यात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
 पणजी गोवा येथे शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांचा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर , माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे , सिने अभिनेते अर्जुन फेम फिरोज खान , दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे , गोव्याचे उद्योगपती बाबूसाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी , सोलापूर भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण , कवी अरुण म्हात्रे , गोवा येथील समाजसेविका चित्रा शिरसाट , ज्ञानेश्वर जावीर , एडवोकेट भारत पवार , हिम्मतराव भाकरे, भीमराव मोरे ,अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे आदींचीं प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिलीप सिध्दे यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देत संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे , अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले , मनोद्दीन कोरबू , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवराज स्वामी , सरफराज शेख, पिंटू साठे, अन्नछत्र मंडळाचे खजिनदार लाला राठोड ,रमेश हलसंगी, संतोष माने , गोकुळ पाटील , असद फुलारी , आकाश उदगिरे , पत्रकार रमेश भंडारी , स्वामीराव गायकवाड , राजेश जगताप , प्रविण पुल्लूर आदींसह महाराष्ट्र आणि गोवा येथील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
Previous Post

पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर यांची मागणी

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून राज्यातील पूरग्रस्तानां मदतीचा हात

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून राज्यातील पूरग्रस्तानां मदतीचा हात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून राज्यातील पूरग्रस्तानां मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157511
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697