अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा उपप्रमुख पदी यांची निवड झाल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉक्टर सत्यजित मस्के यांच्या हस्ते स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत कोळी , मारुती जाधव, श्रीशैलमकर, माताजी उर्फ नंदिनी बिल्ला , यशवंत पाटील , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अक्कलकोट शहराध्यक्ष समर्थ बिराजदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे व इतर मान्यवरानी नूतन जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे यांना मनोगतातून शुभेच्छा देत सामाजिक क्षेत्रासह सर्वसामान्य माणसाच्यां हक्कासाठी त्यांच्या समस्यावर काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.