सामाजिक
सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळी आमरण उपोषण सुरू

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहर तालुक्यातील नागरिकांच्या सोयकरीता अक्कलकोट बस स्थानकातून दक्षिण बाजूला पायवाट सोडण्याकरिता अक्कलकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुडन तांबोळी यांनी दिनांक ९ जून पासून अक्कलकोटातील बस डेपो समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या या उपोषणास रिपब्लिकन पक्ष आठवले गट , वंचित बहुजन आघाडी , लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. बुडन तांबोळी यांच्या या उपोषणास विविध नेते मंडळी , सामाजिक कार्यकर्त्यानी पाठिंबा दिला आहे.
