सोलापूर
जागतिक महिला दिनानिमित्त कुंभार वेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

सोलापूर ( प्रतिनिधी )आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे
यंदाच्या जागतिक महिलादिनानिमित्याने कुंभार वेस येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे.
कुंभार वेस येथे व्यापारी हमाल तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक तसेच मंगळवार बाजार ला जाणारे लोक येतात.
या गजबजलेल्या अश्या जिथे नेहमीच खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. अश्या भुसार गल्लीत थोडक्यात कुंभारवेस येथे यंदाच्या उन्हाळ्यात कुण्या जीवाला पाण्याशिवाय हाल होऊ नये किंवा जीवघेण्या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडू नये म्हणूनच पाणपोईची सोय केलेली आहे .
जिथे रोजच्या रोज स्वच्छ व फिल्टर जारचे थंड पाणी सर्वांनाच सुखावेल व तहानलेल्याची तृषा कमी करेल
हयांच्यासाठी एका ज्येष्ठांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ येणाऱ्या काही काळापुरते पाणपोई पाण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा उचलून
निनावी केलेल्या या दानाचे आस्थाच्या वतीने रितसर जनसामान्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रविकांत तंबाके,राजू हौशेट्टी, संजय पाटील, बाळू भुमकर उपस्थित होते.
तसेच कुंभार वेस येथील व्यापारी दयानंद आडके, आनंद तगी, अरुण आडके,आयुब पठाण, हरुण पठाण, जमादार , आकाश भुमकर संजय गुळगी या सर्वां चीं उपस्थिती होती. या कार्यक्रमास
आस्थाचे अध्यक्ष सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे, छाया गंगणे ,कांचन हिरेमठ ,निलिमा हिरेमठ , मंगल पांढरे, स्नेहा मेहता, नीता अकुडे, संगीता छंचुरे ,लक्ष्मी कुलकर्णी, सुवर्णा पाटील आदीसह आस्था रोटी बँक टीम सदस्य उपस्थित होते.