Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कै. शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ अरुण पवार व बालाजी पवार यांच्या तर्फे गो शाळेला आर्थिक मदत

Admin by Admin
December 11, 2024
in सामाजिक
0
कै. शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ अरुण पवार व बालाजी पवार यांच्या तर्फे गो शाळेला आर्थिक मदत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पिपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )
कै. शकुंतलाबाई श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार यांनी दातृत्वाची पुन्हा प्रचिती देत गोशाळा चाऱ्यासाठी एक्कावन्न हजारांचा आर्थिक निधी गोशाळेला सुपूर्द केला.
श्री दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज येथील महोत्सवात ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवाकुंज आश्रमाचे ह.भ. प. शिवानंद स्वामी महाराज यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय (अण्णा) गणपतराव जगताप, ह. भ. प. बब्रुवान वाघ महाराज, ह. भ.प. निवृत्ती महाराज बोरकर ह.भ.प. आदिनाथ शितोळे, ह.भ.प. धारुमामा बालवडकर, कॅप्टन बालाजी पांचाळ, शिवाजी सुतार, किशोर आटरगेकर, नागेश जाधव, प्रल्हाद पायघन, रामकृष्ण भोसले आदी उपस्थित होते.
ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी अरुण पवार व बालाजी पवार यांच्या दातृत्वाचे कौतुक करीत असा दानशूर सुपुत्र निर्माण होणे, हे आई – वडीलांची पुण्याई असते, असे गौरवोद्गार काढले. तसेच पवार बंधूनी आईच्या स्मरणार्थ केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.
ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांनी सांगितले, की अरुण पवार व बालाजी पवार या बंधुनी या अगोदरही अनेक गो-शाळांना चाऱ्यारुपी मदत केली आहे. गोमाता वाचली पाहिजे याच उदात्त भावनेतून अरुण पवार व बालाजी पवार मदत करत असतात. जेवढे माणसांसाठी सेवाकार्य करतात, तेवढेच मुक्या प्राण्यांसाठी सेवाकार्य करत असतात. वन्य प्राण्यांसाठीही खूप मोठी मदत दरवर्षी पवार बंधू करीत आले आहेत.

Previous Post

घुंगराळ्याचे कृषी व पशु प्रदर्शनाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई..

Admin

Admin

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई..

लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697