सामाजिक
हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैफुलमुल्क चिस्ती दर्गा उरूस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचें आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट
तालुक्यातील हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैफुल मुलक चिस्ती दर्गात उरूस निर्मित दिनांक २७,२८ व २९ नोव्हेंबर रोजी संदल, चिराग , जियारत आदी धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टीचे चेअरमन एम.डी रफीक सिराजोद्दीन मुजावर यानी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील सर्व धर्मीयाचें एक्याचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध हजरत खाजा सैफुल मुलक चिस्ती दर्गाचे उरुस दिनांक २७ पासुन प्रारंभ होत असुन या दिवशी रात्री संदल गंध मिरवणूक पार पडणार आहे.कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परिवाराच्या घरातुन गंध निघणार आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर रोजी चिराग दिपोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच रात्री ९ वाजता गोरखपुर युपी, येथील नुसरत खानम व पुनाचे कामील चिश्ती यांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे.दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पर्यंत महाप्रसाद चालु राहणार आहे. हजरत खाजा सैपुल मुलक चिस्ती या दर्गाचे उरुस सलग तिन दिवस चालणार असुन या ऊरुसमध्ये सर्व धर्मीय बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.या बुरुस मध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
दर्गाह ट्रस्टीचे चेअरमन एम.डी रफीक सिराजोद्दीन मुजावर यांनी केले आहे.
यावेळी व्हा.चेअरमन बंदेनवाज तालाबअली मुजावर,
सेक्रेटरी वकील नबीसाब मुजावर,ट्रस्टी अहमद कादरबाशा मुजावर,ट्रस्टी अ.रउफ अहमदसाब मुजावर,ट्रस्टी बंदेनवाज शिराजोद्दीन मुजावर,
ट्रस्टी याकूबसाब एम.मुजावर,ट्रस्टी जैनोद्दीन तालाबअली मुजावर,ट्रस्टी अय्युब वकील मुजावर, ट्रस्टी बंदेनवाज दस्तगीर बाशा मुजावर आदी उपस्थित होते.