Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कौटगीमठ यांच्या प्रेरणेमुळे सेट परीक्षा उत्तीर्ण – प्रा. सायली पाटील

Admin by Admin
November 25, 2024
in टॉप न्यूज
0
कौटगीमठ यांच्या प्रेरणेमुळे सेट परीक्षा उत्तीर्ण – प्रा. सायली पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथील  प्रा सायली पाटील  या    महाराष्ट्र सेट पास होऊन अक्कलकोटला येऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांची भेट घेतली. प्रा. सायली पाटील यांचा सत्कार धानय्या कौटगीमठ व सौ कौटगीमठ यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील ७७ वेळा सेट, नेट, टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केलेले मंगरूळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांनी समाजमाध्यमावर  यु ट्यूब  मार्फत मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत मोफत मार्गदर्शन व्हिडिओ तयार करून आतापर्यत  ८०२ विद्यार्थी सेट, नेट आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
    येथील  के एल मंगरुळे प्रशालेतील शिक्षक कौटगीमठ अक्कलकोट  यांनी  स्वतःला मिळालेल्या ज्ञान, अनुभव, कौशल्य इतर विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने आपली शाळा सांभाळुन  दररोज संध्याकाळी एक तास मोफत मार्गदर्शन करीत आहे.  कोरोना काळात यु ट्यूब सुरू केले असुन तेंव्हा पासून मोफत मार्गदर्शन सुरू आहे. आता पर्यंत त्यांच्या व्हिडिओचा ३५ हजार ८३९ विद्यार्थीनी ऑनलाइन मार्गदर्शन घेतले आहे. आतापर्यत त्यांचे २७ लाख २७ हजार ४५९ यु ट्यूब व्याख्यान विध्यार्थ्यांनी पाहिले आहे.  महाराष्ट्र गोवा राज्यातील विद्यार्थी साठी प्राध्यापक पात्रता परीक्षा व   विद्यापीठ अनुदान आयोग (यु जी सी), नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी प्राध्यापक पात्रता परीक्षा घेत आहे. समाजातील गरीब, होतकरू , कष्टकरू, महिला , मेकानिक , ड्राइवर , दिव्यांग , शिक्षक  असे अनेक  व्यवसाय करणारे विद्यार्थी धानय्या कौटगीमठ यांचे मार्गदर्शन घेऊन सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन  प्राध्यापक झाले आहेत. 
स्वत धानय्य सरांनी  ४नेट, ३६ सेट, ३६ टी ई टी आणि १ पी एच डी परीक्षा उत्तीर्ण होत जागतिक विक्रम केले आहे. इंग्रजी साहित्य, महिला अध्ययन, भाषा शास्त्र, शिक्षणशास्त्र, लोक साहित्य  असे एकूण पाच विषयात  सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. एकूण १२ वर्षात ७७ परीक्षा उत्तीर्ण झाले.
चौकट – धानय्या कौटगीमठ- प्रशिक्षक-  इयत्ता १० वी ला केवळ ३७ टक्के  आणि  इयत्ता १२ वी ला ३६ टक्के   गुण घेतले. पण खचून न जाता प्रयत्न करून इंग्रजी विषयांतूनच ७७ परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केला. देशातील ५३ विद्यापीठ ला जाऊन  सेट नेट परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले. आई वडील अशिक्षित असूनही मला प्रोत्साहन दिले. 
चौकट  – धानय्या कौटगीमठ  सरांचे  यश व तळमळ पाहून  यु जी सी चेरअमन डॉ भुषण कुमार पटवर्धन यांनी नई दिल्ली येथे सत्कार केले. तसेच  के एल ई संस्थेच्या नाव लौकिक करीत असल्याने के एल ई चे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे  यांनी बेळगाव सत्कार केला.
 चौकट – कौटगीमठ यांनी पेपर एक मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत  एकूण तीन पुस्तके लिहले आहे आणि पेपर २  इंग्रजी साहित्य साठी एकूण पाच पुस्तके लिहले आहे तसेच इतर  १५ विषयावर सुद्धा नोट्स  तयार केले आहेत.      
चौकट –  धानय्या कौटगीमठ सरांचे प्रेरणा घेऊन ,त्यांचं नोट्स वापर करून ,रोज त्यानी केलेल्या व्हिडीओ पाहून महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.गेल्या पाच वेळेस मला अप यश आले आणि जेव्हा धानय्य सरांना प्रत्यक्ष अक्कलकोट ला येऊन भेटून चर्चा करून परीक्षा उत्तीर्ण झाले.माझं लग्न झाले आहे ,लहान बाळा ला संभाळून ,घर संसार सांभाळून ,घरी बसून धानय्य सरांचे यु ट्यूब वरील व्हिडीओ पाहून यश मिळविले आणि आज कोल्हापूर कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून नौकरी मिळाली आहे – प्रा सायली पाटील  ,कोल्हापूर 
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सुभाष देशमुख, विजय देशमुख की सचिन कल्याणशेट्टी !

Next Post

संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Admin

Admin

Next Post
संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697