टॉप न्यूज
जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव ll

जग बदल घालुनी घाव ।
सांगून गेले मला भीमराव ll
गुलामगिरीच्या या चिखलात ।
रुतून बसला का ऐरावत ll
अंग झाडुनी निघ बाहेरी ।
घे बिनीवरती धाव ll
धनवंतांनी अखंड पिळले ।
धर्माधांनी तसेच छळले ll
मगराने जणु माणिक गिळले ।
चोर जाहले साव ll
ठरवुन आम्हा हीन कलंकित ।
जन्मोजन्मी करुनी अंकित ll
जिणे लादुनी वर अवमानित ।
निर्मून हा भेदभाव ll
एकजुटीच्या या रथावरती ।
आरुढ होऊनी चल बा पुढती ll
नव महाराष्ट्रा निर्मून जगती।
करी प्रकट निज नांव ll
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!