सामाजिक
माजलगाव येथे लहान मुलीवर अत्याचार केलेल्या नराधमास फाशी द्या – चंद्रकांत वेदपाठक

अक्कलकोट ( प्रतिनिधी )– बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सोनार समाजातील 5 वर्षाच्या मुलीवर शाळेच्या एका शिक्षकाने जो लैंगिक अत्याचार केला आहे त्या निंदनीय घटनेचा निषेध करत त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व शाखीय सोनार हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सर्व शाखीय सोनार हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा सोनार हक्क परिषदेच्या वतीने माजलगाव येथील सोनार समाजातील पाच वर्षाच्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा एका निवेदनादवारे निषेध नोंदविला
आणि त्या आरोपीचा जलदगती न्यायालयात केस दाखल करून फाशीची शिक्षा ठोठावून त्या पीडित परिवारास न्याय देण्यात यावे अशी मागणी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक व सोनार समाज बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर व निवासी तहसीलदार पाटील यांच्या मार्फत पाठविलेल्या पत्रात केली आहे.
या प्रसंगी सोनार हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, प्रदेश अध्यक्ष रविशंकर धर्माधिकारी, अध्यात्मिक तज्ञ प्रसाद महाराज पंडित,व राज्य युवा उपाध्यक्ष सचिन बानकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून या माथेफिरूस मरेपर्यंत फासी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.
या प्रसंगी सोनार हक्क परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी दीक्षित, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दीपक पोतदार, शहर अध्यक्ष सचिन निंबाळकर, मैंदगी शहर अध्यक्ष श्रीधर पोतदार, माजी उपनगराध्यक्ष अशोक लोहार, श्रीशैल पोतदार, सोमनाथ शिलवंत, आनंद पोतदार, उमेश सुतार, सोलापूरचे मोनेश्वर पोतदार, धोत्रीचे संतोष पोतदार, अकलूजचे अनिल पोतदार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नीलेश महामुनी, कुंभारीचे गेनसिद्द चाकूरकर, दुधनीचे रमेश पोतदार, काळप्पा पोतदार, शरणबसप्पा शिलवंत, गुरूशांत पोतदार, अनिल पोतदार सोनार, भीमाशंकर लोहार, बंटी पोतदार, उदय नरेगल सह मोठ्या संख्येने सोनार व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
