टॉप न्यूज

अक्कलकोट शहर व तालुक्यात गणरायाला भक्तिभावाने जल्लोषात निरोप 

 

अक्कलकोटात ३६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विसर्जन मिरवणुका 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” या जयघोषात अक्कलकोट शहर व तालुक्यात श्री गणेशाला मंगळवारी निरोप देण्यात आला. यावेळी अक्कलकोट शहरात ३६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.गणरायाला निरोप देताना तरुणाईही डॉल्बीच्या गाण्यांवर नाचून गणपती बाप्पाचा जयघोष केला. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक, सामाजिक  तसेच चालू घडामोडीवर आकर्षक देखावे करून उपस्थित गणेश भक्तांचे लक्ष वेधले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे सह इतर मान्यवरांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्यात आले. 
अक्कलकोट शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पौराणिक आणि चालू घडामोडींवर आकर्षक देखावे सादर केले होते .सदरचे देखावे पाहण्यासाठी हजारो गणेश भक्तानी , महिलांनी आबाल वृद्धानी गर्दी केली होती. अक्कलकोट शहरातील कारंजा चौक , मेन रोड ,कापड बाजारपेठ , वीर सावरकर चौक ,राजे फत्तेसिंह चौक या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीर सावरकर चौक येथे सर्व गणेश मंडळांचे स्वागत केले तर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वीर सावरकर चौक मेन रोड येथे सर्व गणेश मंडळाचे स्वागत केले. अक्कलकोट शहरातील श्री रिद्धी सिद्धी गणेश मंडळ सुभाष गल्ली बंजारा गणेश उत्सव मंडळ शिवाजीनगर , स्वामी विवेकानंद पार्क गणेश मंडळ, योगीराज गणेश उत्सव मंडळ इंदिरानगर ,समाधी मठ गणेश मंडळ समाधी मठ , श्रीमंत पिंपळ्या गणेश मंडळ पागा चाळ , सावरकर चौक गणेश मंडळ ,अष्टविनायक कट्टा गणपती खासबाग , ग्वल्ला समाज गणेश मंडळ , राजे प्रतिष्ठान गणेश मंडळ समर्थनगर ,अष्टविनायक गणेश मंडळ खासबाग , बसवेश्वर गणेश मंडळ माळी गल्ली, राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळ देशमुख गल्ली , ब्रम्हांडनायक गणेश उत्सव मंडळ यशवंत नगर , पंजाब तालीम गणेश मंडळ बुधवार पेठ, श्रीराम गणेश मंडळ ,श्री वीरशैव गणेश मंडळ हरवाळकर गल्ली ,जय भवानी गणेश मंडळ कामाठी गल्ली , समर्थ गणेश मंडळ अंबिकानगर ,क्रांती गणेश मंडळ ढाले वस्ती , मातंग समाज गणेश मंडळ माणिक पेठ , कालिका नगर गणेश मंडळ , नवसाला पावणारा गणपती उत्कर्ष नगर, श्री गणेश तरुण मंडळ जय भवानी गल्ली, श्री शिवभक्त बेडर कन्नय्या गणेश मंडळ बेडर गल्ली , वरद विनायक गणेश मंडळ संजय नगर ,श्रीमंत संभाजी चौक गणेश मंडळ ,शिवबसव गणेश मंडळ समर्थ नगर , अक्कलकोटचा राजा गणपती जुना राजवाडा ,त्रिमूर्ती तरुण मंडळ राम गल्ली , श्री वीरशैव हरळया गणेश मंडळ हरवाळकर गल्ली , श्री नवसाचा राजा गणपती मंडळ संजय नगर, नवभारत गणेश मंडळ कारंजा चौक , बंजारा गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर तांडा, अमर गणेश मंडळ संजय नगर हसापूर रोड ,गजराज गणेशोत्सव मंडळ वेताळ चौक आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची भव्य अशी मिरवणूक काढून निरोप दिला.

आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक असे देखावे बहारदार लेझीम मलखांब व खणखणीत आवाजात पारंपरिक वाद्य ढोलीबाजा डीजे साउंड सिस्टीम लावण्यात आली होती.त्यामुळे अजूनच रंगत आली होती.वेताळ चौक तुळजापूर मंदीरचे प्रवेश द्वार
 श्रीमंत संभाजी राजे चौक गणेश मंडळ अक्कलकोट ,
श्री शिवभव बेडर कनय्या चौक तरूण मंडळ , श्रीमंत पिपल्या मारूती गणेश उत्सव तरुण मंडळ पागा चाळ,अमोल राजे लेझीम संघ ,बंजारा तरुण मंडळ शिवाजी नगर तांडा समाज मंदीर अक्कलकोट नर्सिमा देवी ,मानाचा श्रीमत तात्या गणपती राजे प्रतिष्ठान समर्थ नगर अक्कलकोट ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन नुतून देवालय देखावा ,बंजारा  गणेश उत्सव तरुण मंडळ शिवाजी नगर तांडा कालिका देवी ,गोल्ल वस्ती तरुण मंडळ आषाढ  अंबाबाई , सुभाष गल्ली तरुण मंडळ श्री स्वामी समर्थ वटवृक्ष,श्री गणेशा तरुण मंडळ जय जवान गल्ली कालिका देवी,आझाद गल्ली तरुण मंडळ अगोरी बाबा डेकोरेशन महादेव ,पंजाब तालीम मिञ मंडळ दही हंडी देखावा , नवभारत गणेश उत्सव तरुण मंडळ कारंजा चौक मलखब, बाहुली, बैलगाडी, देवी ,अक्कलकोटचा राजा गणपती जुना राजवाडा अक्कलकोट क्रिकेट देखावा ,जय भवानी तरुण मंडळ बुधवार पेठ कामाठी गल्ली अक्कलकोट अंबाबाई मंदिर आदींसह विविध मंडळानीं पौराणिक , सामाजिक व चालू घडामोडीवर आकर्षक देखावे करून उपस्थित गणेश भक्ताचें लक्ष वेधले. रात्री १२ वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी वाद्य बंद करून घोषणा देत शहरातील हत्ती तलावात श्री गणेश मुर्त्याचें विसर्जन केले. शांततेमध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणूका या रात्री एक वाजण्याच्या सुमारास समाप्त झाल्या. गणेश विसर्जन मिरवणूका शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकी दरम्यान शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्थांकडून अल्पोपहार , पाणी वाटप करण्यात आले. अक्कलकोट शहरासह मैंदर्गी , दुधनी व इतर गावांमध्ये मिरवणूका काढून श्री गणेशाला निरोप देण्यात आला. विसर्जन स्थळ असणाऱ्या हत्ती तलाव येथे नगर परिषदेकडून गणेश मुर्त्याच्यां विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
 चौकट – अनंत चतुर्दशी निमित्त निघणाऱ्या मिरवणुकांवर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर –
    दिनांक 17/09/2024 रोजी अनंत चतुर्दशी अक्कलकोट शहरात 41 श्री गणेश विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने अक्कलकोट शहरावर ड्रोन च्या साह्याने पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली होती. तसेच  विलास यामावर, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी  पो नि राजेंद्र टाकणे,सपोनि निलेश बागाव , पोसई पांडुरंग पवार , पोसई करपे , श्रेणी पोसई रामचंद्र राठोड
 श्रेणी पोसई राजू राठोड ,श्रेणी पोसई सिद्धाराम चव्हाण ,श्रेणी पोसई पंडित चव्हाण आदींसह पोलीस अंमलदार – ३५,होमगार्ड – ४० ,एस आर पी एफ- ०१ प्लाटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी बंदोबस्ताचे फिक्स पॉईंट -कारंजा चौक ,वीर सावरकर चौक ,सेंट्रल चौक , राजे फत्तेसिंह चौक ,कमला राजे चौक,मैंदर्गी नाका चौक ,हत्ती तलाव
असा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button