राजकीय
पती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्याकडून पदयात्रेद्वारे प्रचार
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भाजपा महायुतीचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे . शांभवी कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागात जाऊन पती तथा भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. भाजपा व महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी नेते मंडळींकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ग्रामीण भागातील विविध गावात प्रचारावर जोर दिला आहे .पदयात्रा बैठका कॉर्नर सभा यावर भर देण्यात आला आहे. पती तथा भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी त्यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रचारात भाग घेतला आहे. शांभवी कल्याणशेट्टी यांनी मैंदर्गी शहरात प्रचार केला. तसेच विविध गावात जाऊन पदयात्रा काढून मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आहेत. शांभवी कल्याणसाठी या महिला मतदारांना भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याणशेट्टी या प्रचारात सहभागी झाल्याने महिला पदाधिकाऱ्यात उत्साह संचारला आहे.



