
भोकर (हमीदखान पठाण ) येथील म्हैसा ते भोकर रस्त्यावरील पिंपळढव गावा लगत दोन दूचाकी च्या अपघातात मंगळवारी ता २३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर नांदेड ला नेत असताना एकाचा मुत्यु झाला असे एकुन चार जनाचा अपघातात मुत्यु झाल्याची घटना घडली आहे
दुचाकी क्रमांक (एम.एच.२६/सी. के/६६५९) वरून भोकरकडे भरधाव वेगाने जात असताना गावाकडे जाणारे दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ सी एफ /९६१८) यांची समोरासमोर जोराची धडक झाल्याने दुचाकी वरील तिघे जागीच ठार झाले आहेत तर एक नांदेड ला उपचारा दरम्यान नेत असताना मुत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे असे या अपघातात एकुन चार जण मुत्यु झाले आहेत मुत्यु झालेल्याची नावे ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड वय २५ वर्षे रा नांदा म्है प भोकर , गंगाधर विश्वनाथ म्हैसुरे वय ५२ वर्षे रा शिळवणी ता देगलुर ( मातुळ येथील आश्रम शाळे तील स्वयंपाकी हा मु भोकर ) ,परसराम किशन डाखोरे वय ५० वर्षे रा पांडुर्णा ता भोकर ( मदतनिस )हे जागीच मुत्यु झाले तर नांदेड ला नेत असताना विनायक पोशट्टी बोरवाड वय २३ वर्षे रा नांदा म्है प ता भोकर यांचा रस्त्यात मुत्यु झाला असुन गंभीर जखमी श्रावन हानंमत पेडेमोडे वय २३ वर्ष स कुंभारगाव ता बिलोली यांच्यावर नांदेड येथे उपचार चालु आहेत सदरील घटणास्थळी तात्काळ सहाय्यक उपपोलीस निरीक्षक राम कराड , पोलीस जमादार कंधारे दिपक , राजु गुंडेवाड यांनी दाखल होवुन त्यांना ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दाखल केले असता तिन जण मुत्यु झाल्याचे डॉ अनंत चव्हाण यांनी सांगितले तर गंभीर रुणावर डॉ चव्हाण , सिस्टर संगीता ताटेवाड ,भालेराव संगिता यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारा साठी नांदेडला पाठवण्यात आले भोकर पोलिस रितसर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ऊशिरा पर्यंत सुरू होते