सामाजिक
भंडारी समाजाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन व पत्रकार दिना निमित्ताने पत्रकार बांधवांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )-भंडारी समाजाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने यंदाही 2025 वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन व पत्रकार बांधवांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्यविजय कनवेशन मल्टी पर्पज हॉल जुना कुंभारी येथे करण्यात आले.
प्रारंभी भंडारी समाजाचे कुलदैवत श्री यल्लमा देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भंडारी समाजाचे यल्लमा देवीचे सांप्रदायिक भक्त समाजाच्या दिनदर्शिकातून आद्यगुरु श्री नारायण स्वामी व सरदार पापन्ना गौड यांचे दर्शन घरोघरी घडेल तसेच रोजचे पंचांग आधी इतर उपयुक्त दैनंदिन माहिती या दिनदर्शिकातून मिळेल असा विश्वास भंडारी समाजाचे अध्यक्ष जगदीश येमुल् यांनी व्यक्त केले. प्रारंभी सहसचिव वेंकटेश लचमापुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजातील व अन्य सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला. भंडारी समाजातील प्रमुख पाहुणे यल्लदास लचमापुरे, अजीबाबू भंडारी, सिद्धया गुत्तेदार, शिवय्या तांडा, श्रीनिवास गुल्लापल्ली, जनार्दन येमुल,बालय्या मरपेल्ली, यांनी या उपक्रमाचे व सर्व पत्रकार बांधवाचे कौतुक केले. या कार्यक्रमास संचालक मंडळ जगदीश येमुलं, सिद्धया गुत्तेदार, संजीव सुगरे,प्रताप पल्ली पांडुरंग बंदाराम, वेणुगोपाल मारपेल्ली,नरेश चव्हाण,रवी चिंचोळ,विजय मुगळे, तसेच सुदर्शन तेलंग, विकास गुत्तेदार, श्रीनिवास गौड,पप्पू तेलंग, शानया तेलंग (पंढरपूर)हे उपस्थितीत होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रमुख पाहुणे व पत्रकार बांधवांचे आभार प्रदर्शन अध्यक्ष जगदीश येमूल यांनी केले. यावेळी रमेश भंडारी(दैनिक दामाजी) सुदर्शन तेलंग ( सोलापूर आजतक) रमेश कलाल (सकाळ) शिवाजी सावंत (जनक्रांती न्यूज चॅनल) अनिल शिराळकर (दैनिक शिव निर्णय) संजीव सुगरे (लोकमत) स्वामीराव गायकवाड ( संपादक ,अ.कोट) प्रदीप पद्देलवार (युट्युब चॅनल ) यांचा
पुष्पगुच्छ शाल वही पेन कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी भंडारी समाजाचे पत्रकार सुदर्शन तेलंग यांचे असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर या राष्ट्रीय संघटनेत सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाचे अध्यक्ष जगदिश येमूल याच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रमुख पाहुणे व पत्रकार बांधवांचा आभार अध्यक्ष जगदीश येमूल् यांनी मानले.
