सोलापूर

डॉ.आंबेडकर उद्यान व संविधान भवनच्या एक एकर जागेवर संविधान भवन बांधण्याच्या मान्यतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार.मंत्री लोढा यांचे आश्वासन

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा ( नार्थकोट ) सोलापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीच्या वतीने वेळोवेळी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील सन 2022 साली उद्याणासाठी अधिकृतपणे मंजुर झालेल्या एक एकर जागेवर “संविधान भवन” बांधण्यासाठी शासन स्तरावरून अपूर्ण राहिलेली मान्यतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, विभागाचे कॅबिनेट मंत्री मान.मंगलप्रभात लोढा साहेब यांनी सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज दुपारी झालेल्या भरगच्च अशा जाहीर पत्रकार परिषद जाहीर करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आज निवेदन देत असताना यातील शिष्ठमंडळाला वरील आश्वासन दिले आहे. यावेळी सोलापूर शहर मध्य मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे एक धडाकेबाज कर्तृत्ववान युवाप्रिय तसेच लोकप्रिय युवा तडफदार आमदार मान.देवेंद्रजी कोठे साहेब यांनी ही “संविधान भवन” बांधण्यासाठी लागणारा आर्थिक निधी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची ग्वाही या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, सरचिटणीस राजरत्न फडतरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे , प्रसिद्धी प्रमुख गौतम मसलखान, संपर्क सचिव सिद्धार्थ जाधव, कोषाध्यक्ष दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष, नागसेन गायकवाड, धर्मेंद्र चंदनशिवे, व्हि.बी.भालशंकर, प्रविण सोनवणे, मच्छिन्द्र अंगुले यांच्यासह कृती समितीमधील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button