राजकीय

जेसीबीच्या साह्याने फुले उधळून वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे स्वागत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
250 अक्कलकोट विधानसभा
वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला.
 बादोले,  बोरगाव, दहिटणे,  चपळगाव,  बऱ्हाणपूर,  किणी,  काजीकणबस आदी गावात संतोषकुमार इंगळे यांनी प्रचार दौरा केला.
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांच्या गाव भेट दौऱ्याला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद, जेसीबीच्या साह्याने फुले उधळून, हलगी, ढोल ताशा वाजवत, आरती ओवाळून जनतेने स्वागत केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक आघाडी तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, सम्यक राज्य प्रवक्ता रविराज पोटे, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, गंगाराम वाघमारे, साहिल कांबळे, आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button