यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. मुक्ता काटवटे यांना पीएच. डी.प्रदान

करमाळा ( आयुब शेख ): येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा.सौ.मुक्ता प्रल्हाद काटवटे (महाडिक) यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी भूगोल विषयातून पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी ‘Horticulture Farming in Southern Pune District: A Geographical Analysis’ (हॉर्टिकल्चर फार्मिंग इन सदर्न पुणे डिस्ट्रिक्ट अ जिओग्राफिकल ऍनालिसिस) या विषयावर संशोधन प्रबंध विदयापीठास सादर केला. यासाठी त्यांना श्री.शिवाजी, बार्शी येथील भूगोल व संशोधन विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.अर्जुन ननवरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी अभिनंदन केले.