अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक , प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन परिसरातील पागाचाळीच्या समोर दुचाकी व चारचाकी वाहने ही सुसाट वेगाने येत आहेत. यामुळे आबाल वृद्धांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून जावे लागत आहे. पागा चाळी समोर दुचाकी वाहने व चारचाकी वाहने ही गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने येत आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पागाचाळी समोर गतिरोधक बसवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे .अक्कलकोट शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढली असून कमलाराजे चौक परिसरात दुचाकी वाहने व चार चाकी वाहने ही गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने येत असतात यामुळे या परिसरामध्ये छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. या परिसरात शाळा मोठया प्रमाणात असून या ठिकाणी गतिरोधक बसून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मेजर श्रीकांत मोरे यांनी केली आहे.