Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्वतःच्या आजाराला दडवून ठेवणाऱ्या नवरीसह तीच्या नातलगांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Admin by Admin
August 23, 2024
in महाराष्ट्र
0
स्वतःच्या आजाराला दडवून ठेवणाऱ्या नवरीसह तीच्या नातलगांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अकोला :- ( जफर खान )
स्वतःच्या आजाराला आपल्या पतीपासून दळवून ठेवणाऱ्या पत्नीच्या आणि तिच्या नातेवाईकांसह मध्यस्थी महिलेविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुमेध भीमराव गणवीर, राहणार गुडधी तालुका जिल्हा अकोला हा 34 वर्षे तरुण आपल्या वडील आणि बहिणी सोबत राहतो. सदर युवकाला मध्यस्थी महिलेने अमरावती येथून एक चांगली मुलगी स्थळ म्हणून देतो, असे सुचविले आणि त्याप्रमाणे तसे स्थळ सुद्धा आणले. सदर स्थळ शालू खोब्रागडे नामक महिलेने भास्कर दादाराव लांडगे आणि सुनीता भास्कर लांडगे यांच्या स्नेहा नामक मुलीला सुमेधसाठी विवाहस्थळ म्हणून दाखविले. सदर स्थळ दाखवण्याच्या कार्यक्रमांमध्ये आणि लग्न जुळवण्याच्या विधीमध्ये आकाश भास्कर लांडगे या तिच्या भावासह भीमराव घोडेस्वार हा सुद्धा सहभागी होता. त्यानंतर साखरपुडा होऊन दिनांक 3 मे 2023 रोजी रितसर विधीयुक्त विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांतच नवीन नवरीच्या वागणुकीमध्ये पाहिजे तसा सामान्यपणा दिसून आला नसल्याने, आपली फसवणूक झाली आहे असा संशय पती सुमेधला आल्यामुळे लागलीच दीड महिन्यानंतर 19 जून 2023 ला सदर नवीन नवरीची अकोल्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामधे असे लक्षात आले की, सदर नवरीला दुर्धर असा आजार असून हा आजार भविष्यात वाढणारच आहे. तसे तपासणीपत्र सुद्धा डॉक्टरांनी दिले. त्यानंतर नवरीला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, माझ्याकडे दिव्यांगात्वाची प्रमाणपत्र असून ते शासकीय रुग्णालय अमरावती येथील आहे आणि मला हा आजार खूप वर्षापासून आहे. मी आणि माझ्या सर्व संबंधित लोकांना हा आजार माहीत असून सुद्धा तुम्हाला न सांगता तुमच्याशी विवाह केला. त्यानंतर सदर कथन ऐकल्यानंतर दिनांक 6 जुलै 2023 रोजी सदर प्रकरणी सिविल लाईन पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रीतसर लेखी तक्रार देण्यात आली आणि फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची विनंती करण्यात आली पण सदर गुन्हा हा गुन्हा होऊ शकत नाही म्हणून तक्रार नोंदविण्याचे पोलीसांकडून नाकारण्यात आले. त्यानंतर फसगत झालेल्या नवरदेव सुमेधला ही गोष्ट न पटल्याने त्याने त्याचे विधीज्ञ सुमित महेश बजाज, विधीज्ञ वर्षा सदार आणि विधीज्ञ कुणाल शिंदे यांच्याकडे जाऊन न्यायालय लढा लढण्याचे ठरविले. त्यानंतर न्यायालयामध्ये जाऊन भांदवी कलम 156 (3) अंतर्गत करून न्यायालयात दाद मागितली असता जॉईन्ट जे.एम.एफ.सी न्यायाधीश एन. डि. जाधव यांच्या न्यायालयाने सदर तक्रार दाखल करून घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी यांची एका कवितेचे सद्यःस्थितीतील स्मरण

Next Post

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर. पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकऱ्याना आश्वासन 

Admin

Admin

Next Post
महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर. पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकऱ्याना आश्वासन 

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर. पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकऱ्याना आश्वासन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157253
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697