Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते – डॉ धानय्या कवटगीमठ

Admin by Admin
September 2, 2025
in सामाजिक
0
कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते – डॉ धानय्या कवटगीमठ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
“केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे” या उक्तीच्या अर्थाप्रमाणे कोणतीही गोष्ट केवळ विचार केल्याने किंवा इच्छा धरल्याने होत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. म्हणजेच, कोणत्याही कामाचे यश हे कृतीतूनच मिळते, आणि कृती हाच देव आहे, असे मानून प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मंगरुळे प्रशालेतील सहशिक्षक तथा सेट नेट परीक्षेतील विश्वविक्रमवीर व्याख्याते डॉ. धानय्या कवटगीमठ यांनी केले. 
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालय व महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशोत्सवानिमित्त  यंदाच्या पहिल्या वर्षी आयोजित बौद्धिक व्याख्यानातील
 ‘ खडतर प्रवासातून हमखास यश’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना डॉ. कवटगीमठ बोलत होते.अध्यक्षस्थानी  प्र. प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले हे होते. व्यासपीठावर  उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, उपाध्यक्ष श्रीमंत बुक्कानुरे, सचिव दत्तात्रय होटकर, संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कवटगीमठ पुढे म्हणाले, 
विद्यार्थी – विद्यार्थिनीसह पालकांनी केवळ स्वप्न बघून किंवा मनात विचार करून काही साध्य होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते. खरी यश शक्ती ही आपल्या प्रयत्नांमध्ये आणि कृतीमध्ये असते, त्यामुळेच “कृतीतच यश आहे” असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. ‘यत्न तोचि देव’ याचा अर्थ असा म्हणजे जोपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो, तोपर्यंतच देव आपल्या पाठीशी असतो, म्हणजेच आपले प्रयत्नच आपले देव आहेत. जो प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते. म्हणून जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी अपयश आले तरी नाराज न होता सतत प्रयत्न करत राहणे, हे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. कवटगीमठ यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. धबाले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. सी. डी. आणेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर संचालक विरुपाक्ष कुंभार यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक धुळप्पा भजे, राचप्पा वागदरे, रमाकांत राजापुरे, पालक वर्ग, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय, लोकगीतानी रसिकश्रोते मंत्रमुग्ध

Next Post

डोंबरजवळगे येथील गजानन जकिकोरे यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

Admin

Admin

Next Post
डोंबरजवळगे येथील गजानन जकिकोरे यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

डोंबरजवळगे येथील गजानन जकिकोरे यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697