Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Admin by Admin
November 7, 2024
in राजकीय
0
लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना  3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांन मोफत बसप्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यानी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा

1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.2. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.3. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.5. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.

नाना पटोले यांचा फडणवीसांवर पलटवार -आज आम्ही दिक्षाभुमीवर गेलो होतो, बाबासाहेब यांच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, ⁠तो हात आम्ही लावू देणार नाही. समतेची लढाई दिक्षाभूमीवर सुरू केली, ⁠राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, ⁠मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर संविधानाच्या मुद्द्यावरुन पलटवार केलाय.

वर्षा गायकवाड यांनी वेधलं धारावी प्रकल्पाकडे लक्ष -राहुल गांधी यांना मी विनंती करते की, त्यांनी मुंबईच्या लढ्यात सहभागी झालं पाहिजे, ⁠मुंबईच्या जमीन विकल्या जात आहेत. ⁠मुंबईची लूट केली जात आहे, ⁠धारावीला लुटायचं काम सुरू आहे. प्रत्येकाच्या घराची लढाई सुरु आहे, ⁠राहूल गांधी तुम्हाला यासाठी यावा लागेल, ⁠तुम्हाला या ठिकाणी यावा लागेल आणि लढाई लढावी लागेल, असे म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींने मुंबईतील धारावी पुनर्वसन विकास प्रकल्पाकडे लक्ष वेधले.

Previous Post

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ डॉ सावंत यांचा परंडा तालुका संवाद दौरा

Next Post

आमच सरकार आल्यास शेतकर्यांच तीन लाखापर्यंत कर्ज माफ, नियमीत कर्ज फेडणाऱ्याला ५० हजाराचे प्राेत्साहन देणार – शरद पवार

Admin

Admin

Next Post
लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला तिन हजार रूपये, राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा

आमच सरकार आल्यास शेतकर्यांच तीन लाखापर्यंत कर्ज माफ, नियमीत कर्ज फेडणाऱ्याला ५० हजाराचे प्राेत्साहन देणार - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697