Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका

Admin by Admin
September 27, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा राज्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहील. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण विदर्भ म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणांमधील पाणीसाठा वाढणार असून नदीपात्रात पुन्हा विसर्ग करावा लागू शकतो ज्यामुळे पूर येण्याचा धोका आहे. 30 सप्टेंबर पासून मात्र पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होऊन दिवसभरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 5 ऑक्टोबरपूर्वी राज्यातून नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषत: शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा विचार करून शेतीचे कामे आखणी करण्याचा आणि कापणी केलेल्या पिकांचे पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

 

Previous Post

सर्वसामान्याचें मुख्यमंत्री वसंतदादा पाटील

Next Post

अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप

Admin

Admin

Next Post
अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप

अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697