Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राजकारण व समाजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बलभीम शिंदें यांचे निधन,  अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा…

Admin by Admin
January 21, 2025
in सामाजिक
0
राजकारण व समाजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बलभीम शिंदें यांचे निधन,  अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी मंगळवारची सकाळ धक्कादायक ठरली.गोकुळ परिवाराचे जनक बलभीम भाऊ शिंदे यांची अल्पशा आजाराने निधन झाल्याची बातमी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली,अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.अक्कलकोट तालूक्यातील दहिटणेसारख्या छोट्याशा गावात १ जुन १९५० रोजी बलभीम भाऊ शिंदे यांचा जन्म झाला.वडिल स्व.दत्तात्रय शिंदे व आई अंजनाबाईंच्या यांच्या संस्कारात बलभीम शिंदेंचे आयुष्य सुरू झाले.संपूर्ण शिंदे कुटूंबाचा उदरनिर्वाह अल्पशा शेतीवर अवलंबून होता.त्यातच वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी बलभीम भाऊ व बंधु स्व.भगवान शिंदेसह इतर दोन भावंडांवर पडली.ज्या वयात हसणे,खेळणे आणि शिक्षण घेणे ठरलेले असते,त्या वयात संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी चारही भावंडांवर पडली.समाजात वावरत असताना ज्या अडचणी बलभीम शिंदेंना लहानपणी दिसल्यानंतर त्यांच्या मनात समाजकारणाची भावना जन्मास आली.आणि यातुन बलभीम शिंदेंसारख्या समाजकारणी कार्यकर्तृत्वाचा फायदा संपूर्ण अक्कलकोट तालुक्यास झाला.
             बलभीम शिंदे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. समाजकारणातून जी माणसे आपण कमावतो त्यातून राजकारण यशस्वी करता येते हे त्यांनी दाखवून दिले. आज भाजप पक्षाचा जो विस्तार जिल्ह्यामध्ये झाला आहे त्याचा पाया खऱ्या अर्थाने बलभीम शिंदे यांनी रचला होता सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती.स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी सर,
स्वर्गीय बाबासाहेब तानवडे यांच्यासोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.तिघांनीही भाजपच्या विस्तारासाठी स्वतःच्या घरचा कधीही विचार केला नव्हता. त्यांनी चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य पदाची जबाबदारी देखील समर्थपणे पेलत भागाच्या विकासासाठी अंतकरणापासून प्रयत्न केले होते.त्यांनी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक,मराठा समाजाचा जबाबदार नेता म्हणुन लाक्षणिकरित्या काम केले.
त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले.
संपूर्ण चपळगाव गटात शिंदे हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे.प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा लोकहितवादी तत्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख होती.आणि म्हणूनच त्यांना भाऊ या नावाने संबोधले जायचे.चपळगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
‍‍‍‍               ज्या ज्या वेळी चपळगाव पंचक्रोशीत दुष्काळ पडला,त्या त्या वेळी बलभीम शिंदे व संपूर्ण शिंदे कुटूंबांनी स्वतःच्या शेतातील पिके वाळवून पाणीपूरवठा केल्याची बाब जनता कधीच विसरणार नाही.जनतेच्या दुव्याने शिंदे परिवाराने चालविलेल्या कोणत्याही उद्योगधंद्यात त्यांना अडचण आली नाही.अक्कलकोट तालूक्यातील ऊस उत्पादकांची अडचण शिंदेंच्या नजरेतुन हटली नाही.मग बलभीम भाऊ व स्व.भगवान भाऊंनी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी रूद्देवाडीच्या माळरानावर मातोश्री शुगर्सची स्थापना केली.यानंतर शिंदे परिवाराची वाटचाल कधीच थांबली नाहीत.तडवळ व धोत्री या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती करून संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊसाचा प्रश्न मिटवला.शेतकरी जगला तरच देशात लोकशाही नांदेल या तत्त्वाने जगणारे बलभीम भाऊ होते.
               तालूक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक पूसावा यासाठी जलसंधारणाची कामे बलभीम भाऊ स्वतःच्या देखरेखेखाली करायचे.दहिटणेसारख्या छोट्याशा गावात जन्मलेले भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चटणी,भाकरी अनेकदा आनंदाने खायचे.आधूनिक शेती व तंत्रज्ञान फार गरजेचे आहे,असा सल्ला ते वारंवार देत असे.
त्यांनी कधीच श्रीमंतीचा देखावा केला नाही.गरीबी मिटविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कारखान्यात तालूक्यातील अनेक गरीब कुटूंबातील बेरोजगारांना घेतले.
                त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक गरजूला ते सढळ हाताने मदत करायचे.भाऊंनी संपूर्ण आयुष्यभर समाजकारण केले.आज त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र तथा गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे,कपिल शिंदे हे निरंतरपणे चालवत आहेत.
                समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह इतर मान्यवरांनी बलभीम भाऊंच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजातील जागरूक असणारा लोकहितवादी नेता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता दहिटणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Previous Post

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 

Next Post

समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध – आमदार प्रवीण दरेकर

Admin

Admin

Next Post
समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध – आमदार प्रवीण दरेकर

समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध - आमदार प्रवीण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697