Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तुम्ही फक्त लीड द्या, आंबीला भूम, परांड्यासारखं शहर बनवतो! – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Admin by Admin
November 10, 2024
in राजकीय
0
तुम्ही फक्त लीड द्या, आंबीला भूम, परांड्यासारखं शहर बनवतो! – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परंडा ( फारुक शेख )आंबी, ता. भूम – आंबीतून लीड द्या, आंबी हे गाव भूम, परांडा शहरासारखं करून दाखवील, त्यासाठी १०० कोटीच काय पण २०० कोटी लागले तरी निधी देईल, अशी ग्वाही महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आंबी (ता. भूम) येथे दिली. पुढच्या पिढीला रोजगारासाठी स्थलांतर करताना पाहायचे नसेल तर विकासालाच मत द्या, त्यासाठी धनुष्यबाणाचे बटन कचाकच दाबा, असे आवाहनही त्यांनी केले.

भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ आंबी येथे जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत हे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की आंबीच्या विकासासाठी मला तुम्ही १०० कोटीचा निधी मागितला. मी या ठिकाणी सांगतो, की तुम्ही फक्त मला लीड द्या, १०० कोटीच काय आंबी गावाला भूम, परांड्यासारखे बनवू, त्यासाठी २०० कोटी लागले तरी चालतील. आपण निवडून तर येणारच आहोत, पण सर्वाधिक लीड घेणार्‍या पहिल्या पाच आमदारांत आपण असलो पाहिजेत. या भागात विकास काय असतो, हे आपणच दाखवून दिले. हा विकास पुढे सुरूच ठेवायचा असेल तर कुणाच्या भावनिक बोलण्याला बळी पडू नका. मत विकासाला द्या, आपल्याला पुढच्या पिढ्या कामधंद्यासाठी बाहेर पाठवाच्या नाहीत. पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून कचाकच धनुष्यबाणाचे बटन दाबा. मी विकासासाठी मत मागतो, तुम्ही मला मोठा लीड दिला, तर हा तालुका पण पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांसारखा बनविल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रा. डॉ. सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. हातच्या कंकणाला आरसा कशाला, अशी कामे मतदारसंघात केली आहेत. एका एका गटाला ६० ते ७० कोटींचा निधी दिला. एवढा निधी कुठल्याच मतदारसंघात मिळाला नाही. विरोधकांचे नात्यागोत्याचे सरकार होते तरी १५ वर्षांत निधी का आणला नाही? यांनी जिल्हा बँक संपवली, त्यामुळे शेतकर्‍यांच्या ठेवी बुडाल्या. ऊस, दवाखाना, रोजगार, बचतगट, सोयाबीन प्रश्न, बँक, सूतगिरणी ही सर्व कामे दोन अडिच वर्षातच मार्गी लावणार असून, महायुतीचे सरकार सत्तेवर येणारच आहे, तेव्हा शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करणार आहोत. म्हणून येत्या २० तारखेला विकासाला मत द्यायचे आहे, असेही याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत म्हणाले. यावेळी इतरही नेत्यांची भाषणे झालीत, त्यांनी राजकीय विरोधकांवर सडकून टीका केली.
या सभेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोंग्रीकर, भूम तालुका शिवसेनाप्रमुख बालाजी गुंजाळ, सरपंच विठ्ठल वाघमारे, मंगेश गटकळ, शैलेश गटकळ, सुभाष आतकर, माजी सरपंच बाळासाहेब गटकळ, हरी उबाळे, अच्युत गटकळ, सागर भोसले, संदीप गटकळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, जेजलाचे सरपंच सागर गटकळ, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम वणवे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरूषांसह तरूणवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
[11/10, 5:57 PM] Purushottam Sangle: *जयवंतनगर, जांब येथील जनसंवाद दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

– *लाखाच्या लीडने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विधानसभेत पाठविण्याचा ग्रामस्थांचा निर्धार*

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जनसंवाद दौर्‍याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज (दि.१०) त्यांनी भूम तालुक्यातील जयवंतनगर व जांब येथे मतदारांशी संवाद साधला. आपल्याला विकासासाठी तुमची मते हवी आहेत. निवडून तर आपण येऊच, पण तुम्ही मला लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवा, असे आवाहन प्रा. डॉ. सावंत यांनी याप्रसंगी केले, अन् त्याला उपस्थित ग्रामस्थ, महिला, व तरूणवर्गाने जोरदार प्रतिसाद दिला.

यावेळी त्यांनी जयवंत नगर येथे स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. सावंत म्हणाले, की सन २०१३ ची आठवण झाली. गोपीनाथराव मुंडे यांनी फोन करून मला परळी येथे भेटण्यास बोलावले, मी पुण्याहून त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमची चर्चा झाली, एवढा चांगला हिरा माझ्यापासून दूर कुणी ठेवला, असे कार्यकर्त्यांना मुंडे साहेब म्हणाले. मुंडे यांनी मला त्यावेळी शब्द दिला होता, आता तुम्हाला खूप पुढे नेणार, मागे ठेवणार नाही. पण माझं दुर्देव २०१४ ला मुंडे साहेब आपणाला सोडून गेले. मी विकासासाठी इथं मत मागायला आलो आहे, मी विकास करतो, आपण मतदारसंघात विविध कामे केली आहेत. दुसर्‍याचे उणेदुणे काढून मी मतं मागत नाही. आधी केले मग सांगितले, अशी माझी पद्धत आहे. मतदारसंघात मी निधी न दिलेलं एक गाव दाखवा, आणि एक लाख रूपये मिळवा, असे माझे जाहीर आव्हान आहे. आपण बचत गटाच्या माध्यमातून २० ते २५ हजार महिलांना रोजगार दिला. नुसते हळदी कुंकू लावून पोट भरत नाही, त्यासाठी कामं करावी लागतात. मी २०१९च्या निवडणुकीत ‘उजनी’चे पाणी आणण्याचा शब्द दिला होता. तो पाळला आहे. ते पाणी येत्या गुढी पाडव्याला सीना कोळेगाव धरणात पडणार आहे. तरीसुद्धा जोपर्यंत हे पाणी शेतकर्‍यांच्या शेतातील बांधापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. विरोधकांनी दूध संघ, जिल्हा बँक विकून खाल्ल्या. दूध संघाच्या मोटारीसुद्धा यांनी भंगारात विकल्या. येणार्‍या जानेवारीत भूममध्ये शेतकर्‍यांसाठी शेतकर्‍यांच्या हक्काचा दूध संघ उभारणार आहे. त्याचबरोबर आपल्या श्रीराम सहकारी बँकेच्या शाखा आपण जिल्हाभरात काढणार आहोत. त्यामार्फत शेतकर्‍यांना आर्थिक पतपुरवठा करणार आहोत. त्यांनी जे जे मोडून काढलं, आपण त्याची पुन्हा निर्मिती करत आहोत. मी शेतकर्‍यांची कामं करणारा नेता असून, शेतकर्‍यांना खेटा घालू देणारा नाही. तुम्ही २० तारखेला मतदान करा, २३ तारखेला आपण गुलाल उधळू, आणि २६ तारखेला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या मतदारसंघाचा विकास करण्यास आपणास कुणीही रोखू शकणार नाही. यावेळी आ. सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांना उद्देशून, सूतगिरणी, साखर कारखान्याचे शेअर कुठे गेले, असा सवाल केला. त्यांनी त्यावेळी शेतकर्‍यांचा ऊस दुसर्‍या कारखानदारांना दिला, आणि त्या कारखान्याकडून २३०० रूपये भाव घेऊन त्यातही त्यांनी कमीशन खाल्ले, अशी टीकाही तानाजीराव सावंत यांनी केली. माजी आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली गावातील स्मशानभूमी मी बनवली, पाणीटंचाईच्या काळात गिरवलीला पाण्याचे टँकर मी दिले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी देऊ न शकणार्‍यांनी विकासावर बोलू नये, असेही प्रा. सावंत म्हणाले. विकासकामांसाठी निधी आणायला मनगटात दम लागतो, माझ्या भागाच्या विकासकामाच्या मार्गात कुणी अडचण आणत असेल तर पदाला लाथ मारेन, पण त्याला सोडणार नाही. लाडकी बहीण योजनेविरूद्धात कोर्टात जाणार्‍याना १५०० रूपयांची किंमत काय कळणार? माजी आमदार व त्यांच्या बायकांचा चहाचा कप दीड हजारांचा असतो, त्यांना दीड हजार रूपयांची किंमत काय कळणार? अशी टीकाही सावंत यांनी केली.
खेड्यातील मुलींना शाळेत जाता यावे, म्हणून दीड हजार शालेय मुलींना आपण सायकली वाटप केल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा, आधुनिक शिक्षण घेता यावे, म्हणून आपण खेड्यापाड्यातील शाळांना स्मार्ट बोर्ड दिले. पावसाळ्यात शेतकर्‍यांची अडचण पाहाता, शेतकर्‍यांसाठी भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वखर्चातून शेतरस्ते केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मतदारसंघातील आमदाराला नामदार (मंत्री) करण्यासाठी, अडिच वर्षातील केलेली विकासकामे पाहून मतदान करा. १५ वर्षे निष्क्रिय राहिलेल्या माजी आमदाराचे डिपॉझीटच आता जप्त करा. निवडून तर आपण येणारच आहोत, पण मला तुमच्याकडून किमान लाखाचा लीड पाहिजे आहे, असे आवाहन याप्रसंगी तानाजीराव सावंत यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत यांच्या नेतृत्वात अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेशही केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोंग्रीकर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, भूम तालुका शिवसेना प्रमुख बालाजी गुंजाळ, सरपंच विठ्ठल वाघमारे, मंगेश गटकळ, शैलेश गटकळ, सुभाष आतकर, माजी सरपंच बाळासाहेब गटकळ, हरी उबाळे, अच्युत गटकळ, सागर भोसले, संदीप गटकळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्णा गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, जेजलाचे सरपंच्ा सागर गटकळ, भाजप तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम वणवे, वैजीनाथ म्हमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते, सावरगावचे सरपंच शिवहरी महानवर, अर्जुन महानवर, आनंदवाडीचे सरपंच बापू वणवे, शाखा प्रमुख शुभम वणवे, जिल्हा संघटक रवींद्र गुळवे, जांबचे सरपंच समाधान भोरे, बावी सरपंच तात्या ठोबरे, इराचीवाडी सरपंच माजी पं.स.सदस्य वैजीनाथ म्हमाने, माजी पंचायत समिती सभापती रामकिशन गव्हाणे, अ‍ॅड. रवींद्र गुळवे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भोरे, पेढा उद्योजक रामभाऊ ग. जोगदंड, ग्रामपंचायत सदस्य रमेश मुळूक, अशोक भोरे आदींचा समावेश होता. यावेळी बहुसंख्य महिला, पुरूष व तरूणाईची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

मी अजून म्हातारा झालेलो नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळेस मी म्हातारा होईल : शरद पवार

Next Post

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध , महादेव कोगनुरे : गावभेट दौऱ्यादरम्यान मनसेला प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध ,   महादेव कोगनुरे : गावभेट दौऱ्यादरम्यान मनसेला प्रतिसाद

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध , महादेव कोगनुरे : गावभेट दौऱ्यादरम्यान मनसेला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697