Friday, September 11, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी माढा तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 11, 2026
in सोलापूर
0
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी माढा तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

माढा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे माढा तालुक्यासह राज्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार असून सदर प्रकल्पाचा ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी आणि, सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी माढा तालुका काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दि. ११ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

माढा तालुका काँग्रेस राजीव गांधी पंचायती राज संगठनेचे अध्यक्ष संदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या जमिनी बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक व, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून त्यांच्या भावना आणि आक्षेपांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

प्रमुख मागण्या:
१. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा.
२. शेतकऱ्यांच्या जमिनी व हक्कांचे संरक्षण करावे.
३. स्थानिक नागरिकांच्या भावना, हरकती व आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा.
४. बाधित शेतकरी व ग्रामस्थांशी योग्य ती चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्यावा.

“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून विकास होवू शकत नाही” अशी भूमिका माढा तालुका काँग्रेसने घेतली आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि, स्थानिक नागरिकांच्या हितासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शासनाने ह्या आंदोलनाची तातडीने दखल घेवून शक्तिपीठ महामार्गाबाबत फेरविचार करावा आणि, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Previous Post

पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या परंडा तालुक्यातील तरुणाचे टोकाचे पाऊल

Next Post

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याचा माढ्यात तीव्र निषेध

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याचा माढ्यात तीव्र निषेध

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याचा माढ्यात तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158825
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697