Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार

Admin by Admin
September 2, 2026
in धार्मिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड यांचा संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी समर्थांची कोरीव मूर्ती व कृपावस्त्राने मान्यवरांचा सन्मान संपन्न झाला.यावेळी अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक,धार्मिक व भाविकाभिमुख सेवाकार्याचे दोन्ही मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अन्नछत्र मंडळाची आजवरची वाटचाल समाधानकारक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. पवार कुटुंबीयांचे श्री स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धास्थान असून अक्कलकोटशी भावनिक नाते असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भोसले परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हजारो भाविकांच्या निवास, भोजन व विविध सुविधांची प्रभावी व्यवस्था उभी केली असून, त्यातून भाविकांची मोठी सोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत, अक्कलकोटचे नाव देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यात मंडळाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. श्रद्धा, सेवा आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम अन्नछत्र मंडळाने घडवून आणल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी  पालखी परिक्रमा प्रमुख संतोष भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी,मैनोद्दीन कोरबु, सरफराज शेख,प्रशांत शिंदे, महांतेश स्वामी,शिरू कुंभार,गोकुळ पाटील, संतोष माने,अशपाक काझी यांच्यासह अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी,सेवेकरी व भाविक उपस्थित होते.
Previous Post

अन्नछत्र मंडळाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड –  नगरविकास राज्यमंत्री ना.माधुरीताई मिसाळ 

Next Post

जलतरण तलावाला ‘मौत का कुवां’ बनविणाऱ्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे लाक्षणिक उपोषण

Admin

Admin

Next Post
जलतरण तलावाला ‘मौत का कुवां’ बनविणाऱ्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे लाक्षणिक उपोषण

जलतरण तलावाला ‘मौत का कुवां’ बनविणाऱ्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे लाक्षणिक उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (13)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (315)
  • शैक्षणिक (181)
  • सामाजिक (792)
  • सांस्कृतिक (9)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157356
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697