शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इको फ्रेंडली राखी उत्साहात संपन्न

करमाळा ( आयुब शेख )-विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने संस्थेचे सचिव विलासराव घुमरे  यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इको फ्रेंडली राखी उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे युवा नेते , करमाळा विधानसभा मा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय दिगंबरराव बागल हे होते. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अभिमन्यू माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश करे-पाटील, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे तसेच शेखर जोगळेकर, वृक्षप्रेमी व वसुंधरा अभियानचे तालुकाप्रमुख विजय खंडागळे, कवी-वक्ता-लेखक रवींद्र शिंदे, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवानेते व करमाळा विधानसभा माननीय मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष . दिग्विजय बागल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार करावीत असे आवाहन केले तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थिनींनी विद्यार्थी दशेमध्ये विविध कौशल्य आत्मसात करावीत. प्रत्येक विद्यार्थिनींनी दरवर्षी एक तरी झाड लावावे व वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे सांगितले. नैतिक मूल्य, आई-वडिलांचा स्वाभिमान कुठेही दुखावणार नाही याची प्रत्येक विद्यार्थिनींनी काळजी घ्यावी व आपल्या हातून कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. तसेच यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष .गणेश करे-पाटील यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गुरु मंत्र दिला. तसेच यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले- महात्मा फुले यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करावी असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये परिसरातील सर्व झाडांना इको फ्रेंडली राखी बांधून निसर्गाशी नाते घट्ट करण्याचे सर्वांनी ठरवले. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी दोन्ही हात उंचावून प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी अभिवचन दिले की आमच्या हातून कुठलेही गैर कृत्य होणार नाही. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील 630 पेक्षा अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या सर्व विद्यार्थिनींनी मा. दिग्विजय बागल यांना भाऊ मानून राख्या बांधल्या. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनींच्या सर्व अडीअडचणी व समस्या सोडवण्याचे अभिवचन यावेळी भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांनी दिले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार सौ.प्रा.सुरेखा जाधव यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button